उदयनगरात ‘ वरली मटका ‘ जोरावर… अमडापूर पोलीस स्टेशनला दिले निवेदन
MH 28 News Live, उदयनगर येथे बरेच दिवसापासून वरली मटका चक्री अस्या अवैध धंद्याला उत आला असून या सट्टे बाजारामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहे. येथे सट्टा खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशी वर्गाला खूप त्रास होत आहे. येथे राहणाऱ्या महिलांना सुद्धा याचा खूप त्रास सहन करावा लागत असून येथे दारू पिऊन येणाऱ्या लोकांमुळे शाळकरी मुलांना आणि गावातील नागरिकांना उगाच त्रास का सहन करावा असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील अनवर खान यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला दिनांक २६ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात केला आहे. अवैध धंदे हे तत्काळ बंद करून उदयनगर येथील नागरिकांना दिलासा द्यावा असे या निवेदानात म्हटले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button