
दहा लाखाचा दारुसाठा मलकापूर पोलिसांनी केला नष्ट
MH 28 News Live, मलकापूर : मलकापूर शहर पोलिसांनी २०१७ पासून १३५ गुन्ह्यात दहा लक्ष रुपये किमतीच्या जवळपास १२ हजार देशी – विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या, ह्या सर्व दारूच्या बाटल्या न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आल्या आहेत, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर ह्या सर्व दारूच्या बाटल्यांवर जेसीबी फिरवून नष्ट करण्यात आल्या.