
जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या. एलसीबीचा प्रभार अशोक लांडे यांच्याकडे
MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या आदेशाने आज 30 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत कल्याण शाखेचे दिनेश झांबरे यांची बदली जळगाव जामोद ठाणेदार पदी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांची बोराखेडी ठाणेदारपदी तर चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.