
चिखली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी योगेश शर्मा तर सचिवपदी तौफिक अहेमद
MH 28 News Live, चिखली : चिखली तालुका पत्रकार संघाची आज दिनांक ३१ डिसेंबर रोजी स्थानिक शासकिय विश्राम गृह येथे महत्वपूर्ण बैठक मावळते सचिव रवींद्र फोलाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्यकारणी सर्वानुते घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी योगेश शर्मा , उपाध्यक्षपदी कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहेमद , कोषाध्यक्षपदी छोटू कांबळे , सहसचिवपदी इम्रान शहा, संघटकपदी नितीन फुलझाडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सदस्य मनोहर गायकवाड, संतोष लोखंडे, कैलास शर्मा, नितीन गुंजाळकर, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, यांनी मार्गदर्शन करुन नविन कार्यकरणीला शुभेच्छा दिल्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button