
बनमेरू विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
MH 28 News Live, लोणार : येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सहायिका मा.प्रतिभा चव्हाण, प्रमिला खोंदील, सुमन पवार व जितेंद्र झिने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरु यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. यांनी केलेले कार्य किती महान आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर आज आपल्या देशात राष्ट्रपती महिला आहे तसेच आज आपल्या मंच्यावरील आरोग्य सहायिक महिला आणि समोर बसलेल्या सर्व आशा सेविका हे त्यांच्या कार्याचे फलित आहे, असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरु यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सूर्यकांत बोरुळ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सूर्यकांत बोरूळ यांनी केले सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आशासेविका, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.