चिखली अर्बन बँकेची ‘ सुकन्या लक्षाधीश योजना ‘ नव्या स्वरूपात झाली सुरू ” पालकांनी अवश्य लाभ घ्यावा ” अध्यक्ष सतीश गुप्त यांचे आवाहन
MH 28 News Live, चिखली : समाजातील आर्थिक दुर्बल आणि गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या चिखली अर्बन को – आँप. बँकेने आपल्या भूमिकेशी असलेली बांधिलकी वेळोवेळी दाखवून दिली आहे. आता देखील महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बँकेने चार वर्षांपूर्वी चालू असलेली सुकन्या लक्षाधीश ठेव योजना नवीन सुधारणा व अधिक लाभदायक पध्दतीने नव्या स्वरूपात सुरू केली आहे. या योजनेचा जास्तीतजास्त पालकांनी लाभ घेऊन आपल्या मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक तरतूद करावी असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे.
नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत मुलीचे भविष्य अधिक सुरक्षित असावे हा विचार प्राधान्याने केला आहे. शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलीच्या जन्मापासून तिच्या
नावाने नियमितपणे ठेवीच्या स्वरुपात साचवलेली रक्कम ती २१ वर्षांची झाल्यानंतर लाखाचा आकडा पार करते हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मुलीचे शिक्षण आणि लग्नाचा भार पालकांवर न पडता या योजनेतून केलेल्या बचतीमधून त्या खर्चाची तरतूद होणार आहे. कोणत्याच पालकाला मुलीचे ओझे वाटू नये, मुलीच्या जन्माचे स्वागत करून तिच्या भविष्याच्या तरतुदीसाठी चिखली अर्बन बँकेच्या वतीने ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. अत्यंत कमी गुंतवणूकीतून मुलीला लक्षाधीश होता येणार आहे अशी माहिती चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी MH 28 News Live ला दिली.
योजनेत मुलींच्या भविष्याची दूरदृष्टी – सतीश गुप्त
मुलींचा आर्थिक भार आई-वडील डोक्यावर पडू नये, अशा उद्देशाने ही योजना अंमलात आणण्यात आली आहे. योजनेमध्ये मुलींच्या भविष्याबाबत दूरदृष्टी ठेवण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षण आणि लग्नाच्या मा खर्चाचा या योजनेत विचार क करण्यात आला आहे. मुलींबाबत समाजाची मानसिकता आजही बदलेली दिसत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून चिखली अर्बन बँकेने ‘सुकन्या लक्षाधीश योजना’ सुरू केली. दहा वर्षांपूर्वी चिखली अर्बन बँकेने सुरू केलेल्या योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, मध्यंतरीच्या काळात योजना बंद करण्यात आली होती. पालकांच्या आग्रहाखातर ही योजना आता नव्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दहा वर्षांत दामदुपटीपेक्षाही जास्त रक्कम या योजनेंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त पालकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक तरतूद करावी असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button