♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ग्रामपंचायत दारूबंदी ठरावानंतरही सुनगाव मधे दारु विक्री सुरूच. ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनला उपोषणाचा इशारा

MH 28 News Live, जळगाव जामोद : सूनगावात अवैध देशी दारूसह हातभट्टीची दारू सर्रास बनवल्या व  विकल्या जात असून, या दारूमुळे मोठ्यांसह काही अल्पवयीन मुलेही दारू प्यायला लागल्याचे चित्र आहे. गावात दारुबंदी करण्याचा ठराव ग्राम पंचायतीने पारीत करून देखील इथे सर्रासपणे दारु विक्री होत असल्याने गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

सुनगाव येथील शाळांच्या परिसरामध्ये अवैध स्वरूपात  हातभट्टी, देशी दारू यासह विविध ब्रँडच्या दारू मिळत असल्यामुळे या ठिकाणाहून नेहमीच दारू पिणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही दारू विषयी आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊन ,काही विद्यार्थीदशेतील मुलांना दारूची सवय लागत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच गावामध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची संख्या वाढली असून कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दारुला त्रस्त होऊन येथील महिला व पुरुषानी आक्रमक घेत पोलिस स्टेशन गाठून निवेदन देत दारूबंदीची मागणी केली. त्यामुळे पोलीस विभागाने सूनगावातील दारूबंदी केली होती, परंतु हे दारूबंदी दोन तीन दिवस राहिल्या नंतर सूनगाव येथे पुन्हा खुलेआम देशी दारू व हातभट्टीची दारू  छुप्या मार्गाने विक्री होत आहे. यालाच त्रस्त होऊन सुनगाव येथील ग्रामस्थांनी  सूनगाव ग्रामपंचायतलाच दारूबंदीचा ठराव घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार २९ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मासिक सभेत बहुमताने दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला. त्यानुसार सूनगाव ग्रामपंचायतकडून पोलिस स्टेशन जळगाव जामोद पोलीस अधीक्षक बुलडाणा  दारूबंदी विभाग यांना सूनगाव ग्रामपंचायतने पत्राद्वारे सूनगावची दारूविक्री बंद करण्यासाठी सादर  केले आहे.

तरीही सुनगाव येथे देशी दारू व हातभट्टीची दररोज विक्री सुरूच आहे .ती पूर्णपणे बंद करण्यात यावी अन्यथा २४ जानेवारीपासून पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. आज दि. १६ जानेवारी रोजी सुनगाव येथील नागरीकांनी पोलीस स्टेशन जळ्गाव जा.ला निवेदन दिले. निवेदन देते वेळी अयुब तडवी, तुकाराम जाधव, सचिन तायडे, विनोद अंदुरकर, संदेश वानखडे, अमोल तायडे, इतर गावकरी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129