
वायदेबंदी न उठविल्यास सेबीच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटना करणार बेमुदत धरणे आंदोलन खा. प्रतापराव जाधवांना निवेदन
MH 28 News Live, चिखली : भारत सरकारने शेती मालावरील वायदेबंदी न उठविल्यास २३ जानेवारी २०२३ पासून, सेबीच्या कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदन बुलडाणा जिल्हा शेतकरी संघटनेने खासदार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांना १५ जानेवारीला मेहकर येथिल त्यांच्या कार्यालवर चर्चा करून देण्यात आले.
शासनाने २० डिसेंबर २०२२ रोजी एक आदेश काढून मागील वर्षी टप्या टप्याने वायदे बाजारातून बिगर बासमती तांदूळ, गहू, हरभरा, मुंग, सोयाबीन व उपपदार्थ, मोहरी व उपपदार्थ आणि कच्चे पामतेल ह्या सात शेतीमालावर वायदे बाजारात व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली असून ह्या बंदीला एक वर्षाची मुदतवार देण्यात आली आहे. सदरचा निर्णय शेतकरी, व्यापारी व संबंधित उद्योजकाना नुसकानकारक असल्याचे तसेच कापसाच्या भावातील पडझड थांबविण्यासाठी शेतकरी संघटना केंद्र शासनास काही पावले उचलण्यासंबंधी सूचना करत आहे.
त्या याप्रमाणे MCEX प्लॅट फार्म वरील वायदे बंद पडले आहेत. डिसेंबर पर्यंतचे सौदे रोल ओव्हर होणे थांबले आहेत. जानेवारीपासून नविन सौदे लाँच होणे अपेक्षित होते. परंतु सेबीकडून यासाठीची परवानगी प्रलंबित आहे. नविन संदर्भ किंमतीबद्दल अंदाज येत नसल्याने कापूस बाजारात ५०० ते ७०० रुपयापर्यंत भावाची घसरण झाली आहे. हे केवळ सेबी च्या अकार्यक्षमतेमुळे होत असल्याचा आरोप करून संघटनेने निवेदना मध्ये केंद्र शासनास सूचित केले आहे की कापसाचा वायदेबाजार सुरळीत होण्यासंबंधी शासनाने त्वरित पावले उचलावी असे न झाल्यास कुठल्यातरी दबावाला बळी पडून कापसाचे भाव खालच्या पातळीवर ठेवण्यासाठी सेबीचा उपयोग केला जात आहे असे सिद्ध होईन,
चीन व ऑस्ट्रोलीयातील सुत व्हिएतनाम मार्गे किंवा सरळ आयात करून देशात दाखल झाले आहे. जागतिक बाजारपेठेत ज्यावेळी सुताचे भाव १९ रू. होते; त्यावेळी हे सुत भारतात १० रू. च्या भावाने आयात झाले हे डम्पिंग त्वरित थांबले पाहिजे कारण त्यामुळेही कापसाच्या बाजारावर परिणाम झाला आहे. हा व्यवहार अंतरराष्ट्रीय बाजार संहितेच्या विरुद्ध झाला असल्याने संबंधितावर डम्पिंग पेनाल्टी आकारावी. तसेच भरपाईसाठी कापूस निर्यातीसाठी प्रोत्साहपर संयुक्तिक निधी उपलब्ध करून द्यावा.
CCI प्रस्तावित खरेदीकेंद्र सुरु करण्याची गरज नाही तर कापसाचेभाव पडण्याच्या
इतर कारणांकडे लक्ष देण्याची गरज आहे.असे न केल्यास व सेबीने २३ जानेवारीच्या आत शेतीमालावर वायदेबाजार लाधलेली बंदी उठविली नाही तर सेबीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पार्टीच्या व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
खा. जाधवनां निवेदन देताना महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, स्वा.भ प चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, नामदेवराव जाधव, समाधान कणखर, खुशालराव कणखर, भानुदास घुबे, प्रकाश घुबे, दिनकर घुबे, विलास मुजमुले, दत्तात्रय कणखर, विनोद कणखर, महादू वाकोडे, अमोल घुबे, साहेबराव जवंजाळ, जगदीश लोखंडे, विजय घुबे इत्यादी होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button