आदर्श विद्यालयाचे ४ खेळाडू मार्शल आर्टमध्ये राज्यस्तरावर
MH 28 News Live, चिखली : वाशीम येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय कुराश मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये विद्यालयातील ४ खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त करून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले.
या सर्व खेळाडूंचे क्रीडा अधिकारी धारपवार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धैमध्ये मुलींनी विभागस्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. कु.गायत्री लाटे वर्ग ९फ, कु.प्राची परिहार वर्ग ९ फ, कु.अर्पिता गाभणे वर्ग ८ ग, कु.वेदिका धनवे वर्ग ड विजेत्या खेळाडूंचं क्रीडाशिक्षक संतोष गुळवे व होमराज कोळी यांचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे तसेच आदर्श विद्यालयाचे प्राचार्य, उपराचार्य, पर्यवेक्षक व कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button