
आत्महत्या – आय टी आय विद्यार्थांने गळफास घेऊन संपवले जीवन. रॅगिंग व शिक्षकांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा पालकाचा आरोप
MH 28 News Live, लोणार (राहुल सरदार) : लोणार शहरातील आय टी आय च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेला कैलास समाधान गायकवाड या १९ वर्षीय तरुणाने लोणार मेहकर रोडवरील बनमेरू विद्यालयाच्या पाठीमागील चोधरी यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजयसिंग राजपूत लेखनिक चंद्रशेखर मुरडकर बिट जमादार अरुण खनपटे रामकीसन गीते गजानन डोईफोडे झानेश्वर निकस ह्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुगणलायत नेण्यात आले.
दरम्यान मृतकाचे वडील समाधान गुलाबराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी मर्ग दाखल केला. मृतक कैलास गायकवाड हा दिनांक १८ जानेवारी २०२३ च्या सायंकाळी ६ वाजेच्या नंतर निघून गेला. त्या नंतर १९ जानेवारी रोजी त्याचा मित्र नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला. मात्र तो कुठेच मिळून आला नाही. त्या नंतर लोणार पोलीस स्टेशनला त्याबाबत हरवल्याची तक्रार देण्यात आली. १९ जानेवारीला सदर विद्यार्थ्यांचा शोध सुरू असताना त्यांच्या मेहकर लोणार रोडवरील बनमेरू महाविद्यालच्या इमारतीच्या मागील चौधरी यांच्या शेतात बाभळीच्या झाडाला मृतदेह आढळून आला.
मृतकाची कॉलेजमधील अथवा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी रॅंगीग केल्याने व शिक्षकाचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. ही आत्महत्या नेमकी का केली याचा सखोल तपास ठाणेदार विजयसिंग राजपूत, पो. हे. काँ. अरुण खणपटे पो. का. ज्ञानेश्वर निकस हे कसून करीत आहेत.