
निराधार वृध्दांसाठी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम ठरतेय वरदान – राजेंद्र लहाने ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्यावतीने सोलापुरी चादरीचे वाटप
MH 28 News Live, चिखली : माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय उपाध्यक्षा आशाताई पाटील, राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी, प्रदेश अध्यक्ष मंगेश मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हाच्या वतीने तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे सोलापुरी चादरीचे वाटप करण्यात आले.
ऋणानुबंध समाज विकास संस्था,चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन समाजसेवक संतोष कर्हाडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक ग्राहक उपभोकक्ता संरक्षण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र लहाने तर प्रमुख उपस्थीतीत विदर्भ संघटक शिवाजी मोरे, जिल्हा अध्यक्ष राजीव जाधव, जाधव, जिल्हा सचिव विष्णु नवघरे, जिल्हा सहसचिव सुखदेव बोर्डे हे होते.
भोकरगावामधे चिखली तालुक्यातील व परीसरातील निराधार, बेसहारा, घरातून काढुन दिलेले, समाजातील उपेक्षीत वयोवृध्दांसाठी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम वरदान ठरत आहे तसेच निराधार बेसहारा वृध्दांना आधार देऊन जगण्याची आशा देणारे वृध्दाश्रम म्हणजे तुकाराम आश्रय वृध्दाश्रम आहे.असे प्रतीपादन ग्राहक उपभोक्ता रक्षण समीतीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी केले. तसेच वृध्दांच्या सेवेसोबतच भोकर गावातिल गरजु विदयार्थांना मोफत टिवीशन देण्यात येऊन शिक्षणाचे महत्व वाढविण्याचे काम सुध्दा करण्यात येत आहे. म्हणुन या तुकाराम आश्रय वृध्दाश्रमासाठी ग्राहक उपभोकक्ता संरक्षण समितीच्या वतीने भविष्यातही भरपुर मदत करण्यात येईल असे आश्वासन समीतीच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले. यावेळी भास्कर वानखडे, समाधान डोंगरदिवे, भास्कर डोंगरदिवे, प्रियंका वानखडे, खुशी कर्हाडे, सृष्टी कर्हाडे, आचल डोंगरदिवे, नव्या घेवंदे आदी उपस्थीत होते.