
रुचिताने काढलेले स्केच पाहून भारावली रेश्मा…केले तोंड करून कौतुक !
MH 28 News Live, चिखली : स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रंग माझा वेगळा या मालिकेतली अभिनेत्री दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे ही चिखली येथे आ. श्वेताताई महाले यांनी आयोजित केलेल्या हळदीकुंक कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित झाली होती. तिने खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा केले. याप्रसंगी चिखली येथील एका युवतीने स्वतः काढलेले रेशमाचे स्केच तिला भेट दिले. हे स्केच पाहून रेशमा अतिशय भारावली आणि तिने या मुलीच्या बद्दल गौरव उद्गार काढले.
स्थानिक चिंच परिसरातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा येंडोले यांची सून सौ. रुचिता वैभव येंडोले हीला चित्रकलेचा छंद आहे. यामध्ये स्केच प्रकारात ती उत्तम चित्र काढते. रुचिता ही रेश्मा शिंदेची चांगलीच फँन आहे. आपली आवडती अभिनेत्री आपल्या गावात येणार असल्याचे कळताच तिने रेश्माचे सुंदर स्केच रेखाटले. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात रेश्मा आली असता रुचिताने मंचावर जाऊन आ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत तिला हे स्केच भेट दिले. आपले स्केच पाहून भारावलेल्या रेश्माने रुचिताच्या ह्या कलाकृतीचे कौतुक करत तिला शाबासकी दिली.