
टोमणे मारणे जीवावर बेतले… जावयाने सासूचा गळा आवळून केला खून
MH 28 News Live, जळगाव जामोद : जावयाला टोमणे मारण्याच्या कारणावरून मनामध्ये राग धरून मद्यधुंद जावयाने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे उघडकीस आली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गयाबाई बाबुराव पडोळ (६६) असे मृतक महिलेचे नाव आहे. आरोपी सुभाष सुरसिंग बागुल हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे. दारू पिऊन तो नेहमीच सासू गयाबाई बाबुराव पडोळ व पत्नी वनिता यांना शिवीगाळ करून त्रास द्यायचा या त्रासाला कंटाळून सासू गयाबाई ही जावई सुभाष बागुल यास टोमणे मारायची हा राग मनात धरून आरोपी जावई सुभाष बागुल याने तिचा काटा काढण्याचे ठरविले. 27 जानेवारी रोजी सुभाष बागुल याने दारूच्या नशेत सासू गयाबाई बाबुराव पडोळ हि जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे एकटी राहत असलेल्या घरी सकाळी गेला व तिच्याशी वाद घालून तिचा गळा दाबून हत्या केली. सदर बाब गावातील संतोष गुलाबसिंग उशीर यांच्या लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी सुभाष बागुल हा फरार झाला. पोलिसांनी संतोष गुलाबसिंग उशीर रा. पिंपळगाव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष बागुल विरुद्ध कलम 302 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय कैलास चौधरी हे करीत आहेत.