♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीकरांसाठी आजचा दिवस ‘ अपघातवार ‘… दोन युवकांचा बळी घेणाऱ्या भीषण अपघातानंतर खामगाव चौफुलीवर भरधाव टिप्पर एसटी बसवर धडकले

MH 28 News Live, चिखली : दिवस उजाडण्यापूर्वी साकेगाव रोडवर स्विप्ट डिझायर कारचा अपघात होऊन त्यामध्ये दोन युवक ठार तर तीन जखमी झाले; त्यानंतर पहाटे सव्वाचार वाजता खामगाव चौफुलीवर एसटी बसला टिप्परने दिलेल्या धडकेत बसमधील प्रवासी आणि चालक जखमी झाले, त्यामुळे आजचा दिवस चिखली शहरासाठी अपघातवार ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे की, शिवाजीनगर ( पुणे ) आगाराची पुणे – अकोला बस गाडी संदीप महादेव सरकटे यांचे ताब्यातील बस क्रमांक MH-09-FL0471 ला विना नंबर पांढऱ्या रंगाचे टिप्परच्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे टिप्पर चालवून बसच्या मधोमध ठोस मारली, त्यामुळे फिर्यादी बसचालक व बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले. या जोरदार धडकीमुळे बसचा पत्रा, खिडकीच्या काचा व बसचा समोरील शो डॅमेज करून आतील इतर गोष्टींचे २ लाख रुपयांचे नुकसान केले. या घटनेनंतर आरोपी टिप्परचचालक घटनास्थळावर सहकार्य न करता पळून गेला अशा फिर्याद बसचालक सरकटे यांनी चिखली पोलीसांकडे दाखल केली असून त्यावरून टिप्परचालकावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129