
सखु संत्रा आणि टँगो पंच विकताना पकडला; ज्ञानेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकला
MH 28 News Live, चिखली : पोलीस स्टेशन चिखली येथे आज दिनांक 30 .01.2023 रोजी पोलिस निरीक्षक विलास पाटील, ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोहेका निवृत्ती चेके, पोलीस अमलदार उमेश राजपूत, शिवानंद तांबेकर, सुनील राजपूत, राहुल पायघन, रामेश्वर भांडेकर, निलेश सावळे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये अवैध दारू विक्रेता ज्ञानेश्वर गुलाबराव भुतेकर वय ४० वर्ष रा. सवना याचेवर दारूबंदी कायद्यानुसार छापा मारला असता सदर इसम हा नानक सायकल स्टोअर चिखली समोरील मोकळ्या जागेत देशी दारू बाळगून विक्री करताना मिळून आला.
त्याचे ताब्यातून देशी दारू सखु संत्रा टॅंगो प्रीमियम कंपनीच्या प्रत्येकी ९० मिलीच्या ५० शीशा वायरचे थैली सह किमती अंदाजे १७६० /- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका निवृत्ती चेके व त्यांचे पथक करत आहे.