
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
MH 28 News Live, बुलडाणा : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास दि. २० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुकांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू गट, शिवछपत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू गट असे पुरस्कार प्रदान करते.
या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि. ३० जानेवारी पर्यंत मुदत होती. मात्र या कालावधीत खेलो इंडिया आणि इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर आणि स्पर्धा यामुळे अर्ज करण्यास पुरेसा कालावधी मिळालेला नसल्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार दि.२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने, शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button