आकाशात रंगीबेरंगी प्रकाशरांग; बुलढाणा, अकोला, चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दिसला अनोखा नजारा
MH 28 News Live, बुलढाणा : वायव्य ते पूर्वेकडे जवळपास ६० ते ६५ दिव्यांची विविध रंगी प्रकाशरांगेचे अनोखे दृश्य गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता दिसून आले. अकोल्यासह राज्यातील जळगाव, चंद्रपूर, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यातील अनेक भागात हा अनोखा नजारा नागरिकांनी नुसत्या डोळ्यांनी अनुभवला.
प्राथमिक निरीक्षणानुसार ही एक ‘स्टार लिंक सॅटेलाईट’ची रांग असल्याचे कळते, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रभाकर दोड यांनी दिली. काही लोकांना ते दृष्य धूमकेतू किंवा लघुग्रहांचे तुकडे वा उल्का वाटल्याचे दिसून आले. नवीन हिरव्या रंगाच्या धूमकेतूच्या दर्शनाची ओढ असलेल्या आकाश प्रेमींना ही एक अनोखी आकाशभेट अनुभवता आल्याचे खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी सांगितले. या अनोख्या आकाश नजाऱ्याने गत वर्षी २ एपिलला दिसलेल्या अप्रतिम दृश्यांची आठवण करून दिली.
दरम्यान, चंद्रपुरातील खगोल अभ्यासक सुरेश चोपने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्पेस एक्स’ २०१९ पासून आकाशात दिसायला सुरुवात झाली. ही ‘सॅटेलाईट लिंक’ आहे. जगात या सर्वत्र दिसत आहेत. एका पाठोपाठ ५५ लिंक काही दिवसांपूर्वी दिसल्या होत्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button