♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कर्जाच्या ओझ्याला कंटाळला, शेतकरी पुत्राने गळफास आवळला… धामणगाव बढे येथे आत्महत्या

MH 28 News Live, धामणगाव बढे ( वसंत जगताप ) : मोताळा तालुक्यातील धा.बढे येथिल अत्यल्पभुधारक शेतकरी सोनाजी ओंकार सपकाळ यांचा मृतक मोठा मुलगा संदीप सोनाजी सपकाळ ( ४४ ) याने दि. ५ फेब्रुवारी दुपारी १२,३० चे सुमारास त्याचे राहते घरातील टीनपत्र्याचे अॕंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.

शेती व्यवसाय व मोलमजुरी यावर परिवाराचा गाडा भागत नसल्याने सव्वा एकर शेती तेही सततची नापीकी अल्पशा उत्पनात डोक्यावर कर्जाचा डोंगर कर्ज देण्याची वृत्ती जिवन जगणे असहाय्य झाल्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले. ही घटना वा-यासारखी सर्वत्र पसरताच गावात शोकाकुल वातावरण पसरले. शांत स्वभावी मनमिळावू परिवारात अशी दुःखदायक व दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची फिर्यादअभिमन्यू लक्ष्मण सपकाळ याने धामणगाव पो.स्टे ला दील्याने पो. हे. काॕ. प्रशांत पाटील यांनी कायमी मर्ग क्रं. 03/2023 कलम 174 जा. फौ. दाखल केला.
पुढील तपास धा.बढे पो.स्टे चे ठाणेदार भोरकडे यांचे आदेशाने पो.हे.काॕ सुरेश सोनवणे करित आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129