♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींचा क्रीडा भारती शाखा मेहकर च्या वतीने सत्कार

MH 28 News Live, मेहकर – जवळच असलेल्या परतापुर येथे काल क्रीडा भारती मेहकर च्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या लाखंदूर, जिल्हा भंडारा येथे नुकत्याच पार पडलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर तसेच सीनियर वयोगटाच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये स्थानिक मे ए सो हायस्कूल मेहकर येथील विद्यार्थिनी कु. प्रियंका घनवट, कु. निकिता वाघ, कु. उमा शिंदे, कु. पूजा चंदनशिव, या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता ग्रामीण भागातून राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद होती सर्वसामान्य कुटुंबातून कबड्डी सारख्या भारतीय खेळांमध्ये मुलींचा सहभाग हा कौतुकास्पद होता क्रीडा भारती शाखा मेहकर च्या वतीने चारही विद्यार्थिनींचा व पालकांचा पुष्पगुच्छ, पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा क्रीडा भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ मोहन राजदेरकर व प्रमुख उपस्थितीत प्राचार्य कवीमंडन सर होते तसेच कलाविष्कार फाउंडेशन मेहकरचे अध्यक्ष रवीद्र वानखेडे व तायड़े हे सुद्धा उपस्थित होते. समस्त गावकरी व क्रीडा भारतीचे सदस्य यांच्या वतीने या चारही विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन प्रा. गणेश शिंदे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आशिष देशपांडे यांनी केले त्याला कलाविष्कार फाउंडेशन व क्रीडा भारती शाखा मेहकरचे सर्व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप घनवट, शैलेश बावने, संतोष सारडा, डॉ. प्रवीण जोशी, संजय बोरकर,निलेश बावने,अनिल खंडेलवाल , अमित अवस्थी व इतर सर्वच क्रीड़ा भारतीच्या सदस्य मुळे व गावकऱ्यांच्या विशेष प्रयत्न केले. बुद्धिबळातील राष्ट्रीय खेळाडू चेतन संदीप घनवट वर्ग ५ वा याचाही यावेळेस सत्कार मोहन भादुपोता यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थिनींच्या या कामगिरीबद्दल परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129