
पेट्रोल टाकायचाय ? ना हरकत प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करा
MH 28 News Live, बुलडाणा : उद्योग संवर्धन आणि आंतरित व्यापार विभाग वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्रासाठी आता ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी कार्यालयात नविन पेट्रोल पंप सुरू करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव isda.peso.gov.in संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे लागणार आहे. यानंतर नविन प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्विकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.