झोपडीला आग लागून झाला शेतकऱ्याचा करुण अंत; मलकापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
MH 28 News Live, मलकापूर : शेतातील झोपडीत झोपलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे झोपडीला आग लागली होती. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे ही घटना घडली. गणेश नारखेडे असं ३४ वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथील शेतकरी गणेश नारखेडे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात झोपले होते. रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोटरच्या शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या झोपडीला आग लागली.
शेतकऱ्याने या आगीतून सुटका करून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण झोपडीत करंट पसरला होता.
धावपळीत हात लोखंडी पाईपला लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतामध्ये कुणीच नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. त्यामुळे करंट लागून पडलेल्या गणेश यांचा होरपळून मृत्यू झाला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button