♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. श्वेताताई महाले यांच्यामुळे चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलतोय – सतीश गुप्त

MH 28 News Live, चिखली : शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत आ. श्वेताताई महाले यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याने चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश गुप्त यांनी चिखली शहरातील २५ कोटी रुपयांच्या विविध भूमिपूजन प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले.

चिखली नगर पालिकेवर आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती .परंतु काँग्रेसने शहराचा विकास न करता स्वतः विकास केला. काँग्रेसच्या काळात नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. कामे न करताच बिले काढली. त्यामुळे चिखली शहराचा विकास खुंटला. मागील पाच वर्षात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून निधि दिला. परंतु मागील नगराध्यक्षा यांच्या भ्रष्टाचारी कारभाराने कळस गाठल्याने आणि भारतीय जनता पक्षात भ्रष्टाचारी कारभाराला थारा नसल्याने भ्रष्टाचारी लोकांची पक्षातून हकालपट्टी केली. आता राज्यांत शिंदे फडणविस सरकार सत्तारूढ झाल्याने आ श्वेताताई महाले यांच्या विकासाच्या दूरदृष्टी प्रयत्नाने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विशिष्ट नागरी व सेवा सुविधा या योजनेअंतर्गत हद्द वाढ झालेल्या भागामध्ये जवळपास साडे २४.४४ कोटी रुपये विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजने अंतर्गत १६.४२, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत २५.५८ कोटी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १२.६८ कोटी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत ११.९ कोटी असे जवळपास ९१ कोटी रुपये या कामांचे भूमीपूजन संपन्न झाले.

चिखली – जाफ्राबाद रोड पासून ते बोधेकर लेआऊट व पुढे न.प. हद्दीपर्यंत (भानखेड) रस्ता काँक्रेटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम करणे व पेव्हर ब्लाक पदपथ करणे. रू. ५कोटी ५६ लाख रुपये, चिखली शहर सर्व्हे नं. १२३, १२४ लढ्ढा ले-आऊट पासून ते सावजी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता कॉंक्रेटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम करणे. रू. ३,३८,७७,२५०/- या कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला.

शहराला नवीन ओळख द्यायची आहे – आ. महाले

चिखली शहर हे बुलढाणा जिल्ह्याचे मध्यवर्ती आणि मोठे बाजारपेठ असलेले शहर आहे. या ठिकाणी दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे . चिखली येथील एमआयडीसी आता चांगल्या प्रकारे विकसित होत असून या ठिकाणी उद्योगधंदे सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे. चिखलीच्या एमआयडीसीला मोठमोठे उद्योग आणून या ठिकाणची बेरोजगारी संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खामगाव जालना रेल्वे मार्ग आणण्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असून खामगाव जालना रेल्वे मार्ग झाल्यास चिखली तालुक्यातीलच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बेरोजगारी संपुष्टात येईल. परंतु चिखली शहर मागील सत्ताधाऱ्यांमुळे अतिशय मागास राहिलेले आहे चिखली शहराला स्वतःची अशी ओळख निर्माण करणे ही माझे आद्य कर्तव्य असून चिखली शहराला नविन ओळख देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आ श्वेताताई महाले यांनी यावेळी केले.

त्यावेळी जेष्ठ नेते भाजपा सुरेशआप्पा खाबुतरे, माजी नगराध्यक्षा विमलताई देवडे, ज्येष्ठ नेते रामकृष्णदादा शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देवव्हडे, शहराध्यक्ष भाजपा पंडितराव देशमुख, अनिस भाई, बाळासाहेबांचे शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप, भाजपा तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, अंकुशराव पाटील ज्येष्ठ नेते, वीरेंद्र वानखेडे, राजेंद्र व्यास, शिवराज पाटील, गोविंद देवडे, संतोष काळे , सागर पुरोहित, विजय नकवाल, सुरेंद्र पांडे, शैलेश बाहेती, गोपाल तुपकर, सलीम परवेज, शाम वाकतकर, संजय आतार, नगरसेवक, सुभाषआप्पा झगडे नगरसेवक तथा प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129