♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी; १७, १८, १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

MH 28 News Live, चिखली : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवराय यांच्या ३९३ व्या जयंती निमीत्त चिखली येथे सतत १० वर्षापासून सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजीक संघटना, गणेश ऊत्सव मंडळ, दुर्गा ऊत्सव मंडळ, सर्व व्यापारी संघटना, मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीतीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करन्यात येत असते. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी चिखली शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

दि. १७ फेब्रूवारी ते १९ फेब्रूवारी पर्यंत सलग तिन दिवस भरगच्च विविध कार्यक्रमाचे आयोजन शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीतीव्दारे करण्यात आले आहे. दि. १७ फेब्रूवारी वार शुक्रवार रोजी, सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर, दि.१८ फेब्रूवारी शनीवार रोजी, सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत महाशिवरात्री निमीत्त

फराळ वाटपाचा कार्यक्रम, नंतर सायंकाळी ७ वा, हभप सौ. सुनंदाताई भोस ( झिंजाड, रा. श्रीगोंदा जि. अ. नगर ) किर्तनकार, शिवचरीत्रकार, प्रवचनकार यांचा किर्तनाचा कार्यक्रम, दि. १८ फेब्रवारी रात्री १२ वा नंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर फटाक्यांची भव्य आतिषबाजी, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक आणि महापुजा, त्यानंतर सकाळी ११ वाजता महिलांची भव्य मोटरसायकल रॅली, त्यानंतर दुपारी २ वाजता भव्य शोभायात्रा खामगाव चौफुली येथून सुरु होणारआहे. असे भव्यदिव्य कार्यक्रमाचे शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीती चिखलीच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त शिवजयंती ऊत्सव समीती चिखलीच्या वतीने करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129