
महाशिवरात्री निमित्त कावड यात्रेचे आयोजन. श्री अंधेरा महादेव ते श्री पंचमुख्यी महादेव मंदिराच्या शिवलिंगावर होणार जलाभिषेक
MH 28 News Live, चिखली : गत अनेक वर्षापासुन चिखलीतील अनुराधा परीवाराच्या वतीने महाषिवरात्री निमित्त भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दि. १८ फेब्रुवारी रोजी येथील श्री अंधेरा महादेव मंदिर ते श्री पंचमुखी महादेव मंदिर पर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातन पंचमुखी महादेव मंदिर येथील शिवलिंगावर कावडीतुन आनलेले पवित्र जल शिवलिंगावर यावेळी अर्पण करण्यात येणार आहे.
अनुराधा परीवाराचे सर्वेसर्वा माजी आमदार राहुल बोंद्रे सहपरीवार या कावड यात्रेत दरवर्षी आवर्जुन सहभागी होत असल्याने अनेक राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणीक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच षिवभक्त मोठया प्रमाणात या कावड यात्रेत सहभागी होत असतात. यावर्षीही माघ कृ १३ उत्तराषाढा शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी महाषिवरात्र निमित्त भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पवित्र कार्यात परीसरातील शिवभक्त नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महांकालेश्वर मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री अंधेरा महादेव मंदिर येथुन निघालेली कावड यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून खामगांव मार्गावरील श्री पंचमुखी महादेव मंदिर परिसरात पोहचल्यावर तेथील श्री पंचमुखी महादेव मंदिराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात येणार असून सर्व षिवभक्तांसाठी भजन व फराळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
श्री अंधेरा महादेव मंदिर परीसरातुन पवित्र जल घेवून सकाळी ८ वाजता कावड यात्रा चिखलीतील प्रमुख मार्गावरून जुनेगांव, चिंच परीसर, राजा टाॅवर, जयस्तंभ चैक, श्री छत्रपती षिवाजी महाराज चैक, बस स्टॅन्ड, मार्गे श्री शिवाजी शाळेपासुन श्री पंचमुखी महादेव मंदिराकडे प्रस्थान करेल. कावड यात्रेत यावेळेस जवळपास १ हजार कावडधारी सहभागी होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. या कावड यात्रेस अनेक षिवप्रेमी व सामाजिक संस्थाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. तरी या कावड यात्रेत सहभागी व्हावे किमान यात्रेच्या मार्गावर यात्रेचे स्वागतासाठी उपस्थीत राहुन कावडधारींचा उत्साह वाढवावा असे आवाहन महांकालेष्वर मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.