हिंदूराष्ट्र सेनेची बुलढाणा जिल्हा कार्यकारणी जाहीर, युवक, महिला, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचा केला समावेश
MH 28 News Live, चिखली : येथील गुरुद्वारामध्ये हिंदुराष्ट्र सेनेची बैठक पार पडली. संघटनेचे संस्थापक धनंजयभाई देसाई यांच्या आदेशाने भागवत एकादशी पवित्र तिथी पर्व साधून दि. १७ फेब्रुवारी रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे जिल्हा प्रमुख विजय पवार यांनी आगामी तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकार्यांच्या नावांची घोषणा करुन नियुक्तीपत्रे दिली. हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय प्रचारक राजेश पिंगळे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
नूतन कार्यकारिणीमध्ये जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत पिल्ले, अमोल भगवान सुरजूशे, राजू शिंगणे, जिल्हा संघटक रवी माळवंदे, जयदीप मिस्त्री, जिल्हा सहसंघटक दीपक गुळवे, चिखली, जिल्हा सचिव जितेंद्र रनाळकर, बुलढाणा, जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र चोपडा, चिखली, जिल्हा युवा उपाध्यक्ष सागर शामलाल बेंडवाल, बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता महेश चेकेटकर, बुलढाणा, रणरागिनी जिल्हा अध्यक्ष ज्योत्स्ना नागरे, बुलढाणा, आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष गजानन शास्त्री ठेंग, जिल्हा संत संपर्कप्रमुख दत्तात्रय मावळ, जिल्हा विधी प्रमुख अँड. विनोद नरवाडे, मेहकर, चिखली शहर प्रमुख हरीहर सोळंके, संपर्कप्रमुख डॉ. आनंद रिंढे, मठ मंदिर संपर्क प्रमुख मिलिंद चिंचोळकर, बुलढाणा, मठ प्रमुख दिलीप काकडे पेनटाकळी, जिल्हा आखाडा प्रमुख रोशन पाठक, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मंजुळकर, जानेफळ, जिल्हा सत्संग प्रमुख विठ्ठल महाराज साठे, जिल्हा बौद्धिक प्रमुख किरण महाराज शिंदे, जिल्हा गोरक्षा उपाध्यक्ष गोपाल शिराळे यांच्या नियुकतया जाहीर करण्यात आले आहेत.या बैठकीला जिल्ह्यातील हिंदूराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button