♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्या चौघाजणांची हिंदूराष्ट्र सेनेतून झाली हकालपट्टी

MH 28 News Live, चिखली : हिंदूराष्ट्र सेनेतील खामगाव येथील चार पदाधिकाऱ्यांची संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी संघटनेतून हकालपट्टी केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पवार यांनी आज शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी केली.

युवकांमध्ये स्वधर्म आणि स्वराष्ट्राविषयी निष्ठा रुजवून संघटन करण्याच्या उद्देशाने धनंजयभाई देसाई यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या हिंदूराष्ट्र सेनेचे कार्य बुलढाणा जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत संघटनेच्या ध्येयधोरणाविरोधात कृती करणारे खामगाव येथील रोहित पगारिया, अतुल पाटील, शिवा जाधव व आकाश माटकर यांची हिंदुराष्ट्र सेनेमधील सर्व पदे बाद करण्यात आली असून यापुढे त्यांचा हिंदुराष्ट्र सेनेशी काही संबंध नाही असे संघटनेचे जिल्हा प्रमुख विजय पवार यांनी जाहीर केले आहे. आगामी काळात हिंदूराष्ट्र सेना या संदर्भात वरील चौघांशी कुणीही संबंध ठेवू नये असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129