
एसटी महामंडळाने प्रवाशांना उत्तम सेवा द्यावी; बसेसच्या लोकार्पण प्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली अपेक्षा
MH 28 News Live, चिखली: खाजगी प्रवासी बसेसनी कितीही चांगली सुविधा दिली तरी नागरिकांचा विश्वास हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरच आहे. एस टी बस ही खेड्या पाड्यातील गोर गरीबांचे स्वस्त आणि सुरक्षित दळणवळणाचे साधन असून लोकांचा विश्वास केवळ एसटी बसेस करत आहे . त्यांचा हा विश्वास अजून वृद्धिंगत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि एस टी कर्मचाऱ्यांनी सुद्धा नागरिकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्यासाठी प्रयत्नरत रहावे असे प्रतिपादन महाले यांनी चिखली आगारासाठी मिळालेल्या बसेसचे लोकार्पण करताना केले.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी बसेसची अत्यंत खराब अवस्था झालेली आहे . अनेक बसेस कालबाह्य झाल्याने त्या स्क्रॅप करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बसेसचा अत्यंत तुटवडा निर्माण झालेला होता . त्यामुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यासाठी आ श्वेता ताई महाले पाटील यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देऊन जिल्ह्यासाठी विशेषतः चिखली आणि बुलढाणा आ, गारासाठी नवीन वीस नविन बसेसची मागणी केली होती . त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन बुलडाणा जिल्ह्यासाठी ८७ तर चिखली आणी बुलडाणा आगारासाठी प्रत्येकी १० अशा २० बसेस मिळाल्या असून त्या बसेसचे पूजन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात येवून लोकार्पण करण्यात आले.
चिखली शेगाव पाहिली बस फेरी
पहिल्या टप्प्यात मिळालेल्या बसेसचे चिखली आगारातून प्रवाशी सेवेत दाखल होताना चिखली ते विदर्भ पंढरी संत गजानन महाराज संस्थान शेगाव ही पाहिली फेरी सुरू या नवीन बसेस सोडण्यात आल्या.
एस टी कर्मचारी यांनी मानले आभार
आ. श्वेताताई महाले यांनी प्रयत्न केल्यामुळे चिखली आणि बुलढाणा आगाराला वीस बसेस उपलब्ध झाल्या. त्यामुळे एस टी कर्मचारी यांनी आ. श्वेताताई महाले यांचे आभार मानले.
त्यावेळी प्रमूख उपस्थीती म्हणून प्रभारी विभाग नियंत्रक गाडबैल , विभा, वाहतुक अधिकारी कच्छवे आगार प्रमुख इलामे , कार्यशाळा अधिक्षक जाधव, भाजपा शहर अध्यक्ष पंडीतराव देशमुख, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, शेख अनिस, शिवराज पाटील , संतोष काळे , बंडु अंभोरे , सुहास शेटे माजी नगराध्यक्ष, हरीभाऊ परीहार, संजय सदार, छोटु कांबळे , कैलास गाडेकर ,समाधान गाडेकर बद्रीनाथ महाले एस. टी.अधिकारी व कर्मचार सचिन लोखंडे, सुनील पाटील , दत्ता निर्मळे, सुरेश इंगळे, दत्ता ढवळे , गणेश इंगळे, आर.आर.पाटील , सागर जाधव, डी. एस. कायंदे , जगन्नाथ सुरडकर, हिवाळे, उत्तम गिरी , चेके पाटील , गजानन परिहार ,उमेश फोलाने , संतोष ढोणे, स्वप्निल गाडेकर, विष्णु म्हस्के, तायडे व स्वातीताई मोरे आणि असंख्य प्रवासी उपस्थित होते.