
खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझ पदक विजेत्या मैंद भगिनींचे केले आ. श्वेताताई महाले यांनी कौतुक
MH 28 News Live, चिखली : जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान तृतीय खेलो इंडिया हिवाळी सब ज्युनिअर, ज्युनिअंर अँड सिनिअर नॅशनल चॅम्पीयनशिप स्पर्धेत गायत्री व किरण मैंद ह्या दोघी बहिनिंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत या स्पर्धेत सिनिअर मुलींच्या संघामध्ये सहभागी होऊन दोघींनी कांस्य पदक प्राप्त केले. याबद्दल आ. श्वेताताई महाले यांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले.
गुलमर्ग, जम्मू काश्मीर येथे ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान तृतीय खेलो इंडिया हिवाळी सब ज्युनिअर, ज्युनिअंर अँड सिनिअर नॅशनल चॅम्पीयनशिप २०२३ आयोजित
करण्यात आली होती. या स्पर्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक, खेलो इंडिया व इंडियन ऑलिम्पिक यांच्या आधिपत्याखाली व कर्लिंग फेडेरेशन ऑफ इंडिया व जम्मू आणि काश्मीर कर्लिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पो. उपनिरीक्षक गणेश मैंद यांच्या दोन्ही कन्या गायत्री मैंद,किरण मैंद ह्यांची कार्लिंग या खेळा करिता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती गायत्री व किरण मैंद ह्या दोघी बहिनींनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत या स्पर्धेत सिनिअर मुलींच्या संघामध्ये सहभागी होऊन दोघींनी कांस्य पदक प्राप्त केले. या अगोदर त्यांनी याच खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले . या दोन्ही भगिनींना आ. श्वेता ताई महाले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
या स्पर्धेमध्ये १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कर्नाटकला सुवर्ण, जम्मू काश्मीरच्या मुलींनी रजत महाराष्ट्र मुलींच्यासंघाला कांस्य व मुलाच्या संघाने रजत पदक मिळविले यांच्या यशाबद्दल पंचक्रोशीत त्यांचं कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल आ. श्वेताताई महाले यांनी त्यांचा सत्कार करून राष्ट्रीय स्तरावर आल्यात पुढे यशस्वी होण्यासाठी शुभकामना दिल्या. यावेळी अँड. दिलीप यंगंड, डॉ. अजय अवचार, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव देशमुख, गोविंद देव्हडे, नामदेव गुरुदासानी या नगर सेवकांनी व चिखलीकरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आपल्या या यशाचे श्रेय त्या आई वडील, प्रशिक्षक व महाराष्ट्र कर्लिंग संघटनेचे सचिव शेख साबीर पुणे, श्रीराम निळे, अँड. दिलीप यंगंड, डॉ.अजय अवचार चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा व काका चंद्रशेखर मैंद यांना देतात.