
युद्धकाळात Taj Mahal का झाकून ठेवतात ? कारण ऐकून चकित व्हाल !
MH 28 News Live : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल हा भारतीय भारतासाठी एक अमूल्य ठेवा असून तो वैश्विक वारसा पण आहे. त्यामुळे सहाजिकच केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने ताजमहालाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शत्रू राष्ट्राकडून या बहुमूल्य ताजमहालाचा ताजमहाला धोका पोहोचू नये याकरता भारत सरकार व भारतीय लष्करांकडून युद्धकाळात सर्वतोपरी काळजी घेतली जाते. युद्धकाळात भारतीय सैन्याकडून ताजमहाल झाकण्याची अनेक कारणे आहेत. यामागील मुख्य उद्देश हा ऐतिहासिक वास्तूचे शत्रूंपासून संरक्षण करणे हा असतो.

ताजमहाल झाकण्याची कारणे
▪️ हवाई हल्ल्यांपासून बचाव: युद्धकाळात शत्रू देशांकडून हवाई हल्ले होण्याची शक्यता असते. ताजमहाल ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि लक्षवेधी वास्तू असल्यामुळे, ती शत्रूंसाठी एक सोपे लक्ष्य बनू शकते. त्यामुळे, या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी ताजमहाल झाकला जातो.
▪️ दिशादर्शक म्हणून वापर टाळणे: उंच आणि विशिष्ट आकारामुळे ताजमहालचा वापर शत्रू विमानांद्वारे दिशादर्शक म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे, तो झाकल्यास शत्रूंना अचूक दिशा मिळवणे कठीण होते.
▪️ मानसिक खच्चीकरण टाळणे: ताजमहाल हे भारताचे सांस्कृतिक प्रतीक आहे. जर शत्रूंनी या वास्तूला नुकसान पोहोचवले, तर त्याचा भारतीयांच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, शत्रूंचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी ताजमहाल सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते.

अशी उदाहरणे कधीकधी घडली: ताजमहालला युद्धकाळात झाकण्याची काही प्रमुख उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत
▪️ दुसरे महायुद्ध (1942): दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जपान आणि जर्मनीच्या हवाई हल्ल्यांच्या भीतीने ब्रिटीश सरकारने ताजमहालच्या डोक्यावर बांबूचे मोठे बांधकाम केले होते. ज्यामुळे आकाशातून पाहिल्यास तो बांबूचा साठा असल्याचा भास व्हावा आणि शत्रूंचे लक्ष दुसरीकडे वळावे.
▪️ भारत-पाकिस्तान युद्ध (1965 आणि 1971): 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यानही ताजमहालला हिरव्या रंगाच्या जाड चादरीने झाकण्यात आले होते. तसेच, त्याच्या आसपास झाडपाला आणि फांद्या ठेवून तो परिसर एखाद्या सामान्य टेकडीसारखा दिसावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी ताजमहाल आणि परिसरातील सर्व दिवे बंद ठेवण्यात आले होते आणि पर्यटकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता.
▪️ 9/11 चा हल्ला (2001): अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ताजमहालला काही दिवसांसाठी हिरव्या चादरीने झाकले होते.
या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की, युद्धजन्य परिस्थितीत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी भारतीय सैन्याकडून आणि प्रशासनाकडून योग्य ती पाऊले उचलली जातात. ताजमहालला झाकणे हे त्याचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे.



