
बुलढाण्यातल्या कॅफेंमध्ये चाललंय तरी काय ?; १५ कँफेंवर पोलिसांचे छापे, युवकांसह या आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या
MH 28 News Live, बुलढाणा : शहरातील विविध कॅफेंमध्ये द्वार बंद सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी या कॅफेंचा गैरवापर करत असतात. असा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. बुलढाणा शहरात ठिकठिकाणी कॉफी कॅफे थाटण्यात आले आहेत. या कॅफेमध्ये द्वारबंद कॅबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या द्वार बंद कॅबिनचा काही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गैरफायदा घेतात. अशी तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई करण्यात आली.
या कारवाईत तब्बल १५ कॅफेंवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एका कॅफे मालकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कंडोमची पॉकीटही सापडली आहेत. यात विशिष्ट अशा कॅबिन बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कपलसाठी अंधार असतो. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे कॅफे आहेत. शाळकरी मुली-मुले आणि अल्पवयीन सुद्धा असतात, अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली.
बुलढाणा शहरात असे काही कॅफे आहेत. याची कल्पना प्रशासनाला नव्हती असे नाही. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. यात कंडोमची पॉकीटं सापडलेत. ही धोक्याची घंटा समजली जात आहे. कॅफेच्या नावावर येथे आणखी कायकाय चालते, याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार शहरातील १५ कॅफेंवर तपासणी करण्यात आली. डीबी पथक आणि पोलीस यांच्यावतीनं करण्यात आली. यात कॅफेमध्ये गैरशिस्त वर्तन करताना मुलं-मुली दिसले. सहा जणांवर कारवाई करण्यात आली. नेव्हिगेटर या कॅफेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली आहे. परवान्याच्या अटीशर्तीबाबत तपासणी करण्यात येईल. स्थानिक प्रशासनाला अवगत केले जाणार आहे. वारंवार तपासणी करावी. नियमांचे पालन करत नसतील तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button