♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“मला तू आवडते, नकार दिल्यास कुटुंबासह ठार मारणार”, प्रेमवेड्या मजनूची न्यायालयीन कोठडीत रवानगी

MH 28 News Live, खामगाव : मुलीच्या घरी जाऊन ‘तू मला आवडतेस, आपण लग्न करू, नकार दिल्यास तुझ्यासह कुटुंबाला ठार मारेन,’ अशी धमकी देत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातून पळवून नेलेल्या अल्पवयीन कुमारिकेला गेल्या आठवडाभरापासून अकोट शहरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवल्याची घटना २ मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी प्रमुख आरोपीसह त्याला सहकार्य करणारी त्याची मावशी, दोन भाऊ व आईविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी व त्याच्या भावाला अटक केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील १७ वर्षीय बालिकेला गावातील मुख्य आरोपी श्याम गणेश गायगोळ (२८), भारत गणेश गायगोळ (२६), उषा गणेश गायगोळ (रा. जळका भडंग), वेणूबाई भिसे (रा. लामकानी) या आरोपींनी १९ फेब्रुवारी रोजी धमक्या देत बळजबरीने तिच्या घरातून बाहेर काढून पळवून नेले. कुटुंबातील सदस्यांनी याबाबत पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर आरोपींचा सुगावा लागत नसल्याने ठाणेदार सतीश आडे यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. मुलीला डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती मिळवली.

अकोट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून मुलीला ताब्यात घेतले. बालिकेच्या जबाबानुसार आरोपींनी घरातून उचलून नेत बळजबरीने फूस लावून पळविले. आरोपीने स्वतःच्या दुचाकीवर बसवून शेगावला दोन तास ठेवले. तेथून चारचाकी वाहनातून अकोट शहरात नेले. तेथे बांधकाम झालेल्या इमारतीच्या टिनशेडमध्ये ठेवून बाहेर निघाल्यास जीवानिशी मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ३६३, ३६६, ३६८, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल केले. अधिक तपास ठाणेदार सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकाँ अनिल इंगळे, गोपाळ सोनोने करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129