♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” ये शहर है अमन का यहापे सब शांती शांती है…” धुळवडीच्या सायंकाळी चिखलीत ‘ राडा ‘ माजी नगराध्यक्ष पतीसह कुटुंबातील तिघांवर गुन्हे दाखल

MH 28 News Live, चिखली : होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुळवडीचे औचित्य साधून खरे तर आपसातील जुने वाद व भांडण तंटे मिटवले जातात. मात्र काल दि. ७ मार्चला आलेल्या धुळवडीच्या सायंकाळी चिखली शहरात जुनी अदावत उफाळून आली आणि यातून झालेल्या राड्यामध्ये माजी नगराध्यक्ष पती, त्याचे काका आणि भाऊ अश्या तिघांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत फिर्यादी विजय भगवानराव वाळेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार काल सायंकाळी ६ : ३० वाजता वाळेकर हे आपला मित्र कुलदीप पटेल याच्या सोबत विजय पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ राहणारे विजय पाटील हे घरी नसल्याने वाळेकर व पटेल माघारी फिरले. दरम्यान जयस्तंभ चौकात पायी येत असतांना वाटेत आरामशीन समोर शिवराज काशीनाथ बोंद्रे हा उभा होता. त्याने विजय वाळेकरला आवाज दिला. परंतु वाळेकर तेव्हा तेथे न थांबल्यामुळे शिवराज याचे काका सुरेशअप्प विश्वंभरअप्पा बोंद्रे, चुलत भाऊ जय सुभाषअप्पा बोंद्रे व कुणाला सुभाषअप्पा बोंद्रे ( माजी नगराध्यक्ष पती ) यांनी मला रस्त्यात अडवले. वाळेकर यांच्या सांगण्यानुसार ” सुरेशअप्पा विश्वंभरअप्पा बोंद्रे हे मला म्हणाले की, तू आमच्या विरुध्द प्लाँट संदर्भात खोटयानाट्या केसेस केलेल्या आहेत. याला धरा व मारा ” असे म्हणून तीघांनी मला लाथाबुक्यांनी तसेच माझ्या डोक्यात चापट बुक्कयांनी मुक्का मार मारला. यावेळी तेथे हजर असलेल्या इतर ८ ते १० लोकांनी संगनमत करून मला व माझा मित्र कुलदीप पटेल याला चापटाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे माझ्या डोक्यावर मुक्का मार लागला आहे.”

मारहाण चालू असताना सुरेशअप्प विश्वंभरअप्पा बोंद्रे यांनी ” तू आमच्या विरुध्द दिलेल्या केसेस मागे घे ” असे म्हणून शिवगाळ करुन जीवाने मारण्याची धमकी दिली असे विजय वाळेकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

पोलीस ठाण्यात जमली एकच गर्दी

वाळेकर आणि बोंद्रे यांच्यात ‘ राडा ‘ झाल्याची माहिती वार्यासारखी शहरात पसरली आणि लगोलग विजय वाळेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले. या दरम्यान वेगवेगळ्या अफवा शहरात पसरु लागल्याने काही काळ तणावसदृश्य वातावरण निर्माण झाले होते. विजय वाळेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी सुरेश विश्वंभरअप्पा बोंद्रे, जय सुभाषअप्पा बोंद्रे आणि कुणाल सुभाषअप्पा बोंद्रे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम १४३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129