
दुर्धर आजाराने ग्रस्त देवयानीला दिला मदतीचा हात; पत्रकार छोटू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ आणि मित्र परिवाराच्या वतीने केली आर्थिक मदत
MH 28 News Live, चिखली : स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विजय खरे यांची चिमुकली देवयानी ही ‘ थँलेसिमिया मेजर ‘ ह्या दुर्धर आजाराने जन्मत : ग्रस्त आहे. दर १५ दिवसांनी रक्त देण्यासाठी तिला रुग्णालयात न्यावे लागते. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एकूण १५ लाख रुपये खर्च लागणार आहे. सामान्य कुटुंबातील विजय खरे यांची आर्थिक परिस्थिती एवढा खर्च उचलण्यासारखी नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार छोटू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुका पत्रकार संघ आणि मित्र परिवाराच्यावतीने दि. २० मार्च रोजी आर्थिक मदत करण्यात आली.
दैनिक ‘ आम्ही चिखलीकर ‘ चे संपादक छोटू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून चिखली तालुका पत्रकार संघ व मित्र परिवाराच्या वतीने थँलेसिमी मेजर ह्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या देवयानी विजय खरे हीला रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली. चिखली तालुका पत्रकार संघ , आणि नारायण भोलवनकर, अक्षय चिंचोले, प्रशांत ढोरे पाटील, दत्ता वजगडे व मित्र परिवाराने पाच हजार शंभर रुपयांची आर्थिक मदत कु. देवयानी हीला केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शैलेश बाहेती , चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा, कैलास शर्मा, कैलास गाडेकर, संतोष लोखंडे, रेणुकादास मुळे, मोहन चौकेकर , तौफिक अहेमद, भारत जोगदंडे, कमलाकर खेडेकर, राजू सुरडकर, नितीन फुलझाडे, राजेश बिडवे, अक्षय चिंचोले, प्रशांत भटकर, विष्णू आव्हाळे हे उपस्थित होते.