♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बाजार समिती निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार लोणार येथील बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार

MH 28 News Live, लोणार : होऊ घातलेल्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा व शिवसेना शिंदे गट युती करून लढणार असल्याची बातमी शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने व्हायरल होताच दुसऱ्या दिवशी लोणार तालुका व शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची विश्रामगृह लोणार येथे दिनांक २६ मार्च २०२३ रोजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत शिवसेना शिंदे गट लोणार यांनी भाजपा लोणार यांच्याशी युतीबाबत कुठलीही चर्चा न करता युती झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र लोणार तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका संदर्भात कुठल्याही प्रकारची युती केलेली नसून ही एक अफवा असल्याचे सांगत भाजपा निष्ठावंत कार्यकर्ता कडुन लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढून शेतकरी, कष्टकरी, हमाल, अडते बांधवांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक भाजपा साठी महत्वाची असुन शेतकरी व अडतदार व हमाल बांधवांना विश्वासात घेऊन तसेच भाजपा तालुक्यातील व वरिष्ठ पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच आपण ही निवडणूक स्वबळावर लढु व त्यासाठी भाजपा लोणार तालुका व शहरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न करून लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे एकमताने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये जरी भाजपा व शिवसेना शिंदे गट यांची युती असली तरी मात्र लोणार तालुक्यात युती सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम व निवडणुका दोन्ही पक्षांच्या संगनमताने होत नाहीत. फक्त निवडणुकी कामी भाजपा सोबत युती असल्याचे दाखविले जाते अशी एक नाहीतर अनेक चर्चा भाजपा लोणार तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते करताना दिसून येत आहे. यावरून लोणार तालुक्यात शिवसेना शिंदे गट व भाजपा एकत्र लढणार की कसे याकडे लोणार तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे !

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव सानप यांचे आदेशानुसार भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी, जिल्हा नेते विजय मापारी, मारोतराव सुरूशे, संतोष देशमुख, शिवाजी सानप, उद्धव आटोळे, तेजराव घायाळ, प्रकाश महाराज मुंडे, बाबाराव गिते, संजय दहातोंडे, सुरेश अंभोरे, प्रकाश नागरे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बनमेरू, राम मापारी, सचिन डहाळके, दिनकर डोळे, बद्री कांगणे, गणेश तांगडे, दिलीप राठोड, सखाराम कुळकर्णी, प्रवीण धाइत, गजानन वाघ, शेख जावेद, फिरोज खान, पंढरी सांगळे, मनोहर पडघान, पिंटू चाटे रवींद्र दराडे, मोरे मामा, संजय डोळे, सुनील मुंडे. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तारामती जायभाये. गणेश डोळे. कचरूदादा डोळे. विष्णू डोळे डॉ. नागरे. अमोल पसरटे. अभिषेक सानप. गजानन डव्हळे.आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा कार्यकर्त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय विश्लेषका. मध्ये सदर निवडणुकीबाबत चर्चा होत असून येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष स्वबळावर लढल्यास प्रत्येक पक्षाची राजकीय ताकद निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीची ही रंगीत तालीम ठरेल.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129