♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ठाणेदार भूषण गावंडे यांच्या कार्यक्षमतेचा लागणार कस… शहरातील अनागोंदीला अंकुश बसणार का ?

MH 28 News Live, सत्य कुटे, चिखली : चिखली पोलीस स्टेशन हे महसूल दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे ठाणे. तूर्तास शहराची वाढत चाललेली लोकसंख्या पाहता शासन सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भरिसभर मागील काही दिवसांत झालेली शहर हद्दवाढ पाहता शहराचे क्षेत्रफळ विस्तारले असून संपूर्ण शहरातील शिस्त व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गत काही दिवसांपूर्वी शहरातील विविध भागात चोरीच्या घटना घडल्या. संभाजी नगर, सहारा पार्क, पुंडलिक नगर, दांडगे लेआउट परिसरातील झालेल्या चो-यांच्या प्रकारांनी त्या त्या भागातील निवासी नागरिक भयभीत झाल्याचे चित्र ठळक झाले आहे.

जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पोलीस ठाणे म्हणून चिखली पोलीस स्टेशनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, मागील काही दिवसात येथील पोलीस निरीक्षकांच्या बदली -नियुक्ती च्या लपंडावात शहरासह तालुक्यातील शासन सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहर तसेच.तालुक्यात सायबर गुन्ह्यांसह चोरी व तत्सम प्रकरणे बोकाळली असून या बाबतीत विद्यमान ठाणेदार भूषण गावंडे यांनी ठोस पावले उचलून योग्य ती कारवाई करावी आणि शहरातील अनागोंदीला विराम मिळावा,असे शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

गस्त वाढवणे ही तेवढेच महत्त्वाचे

शहरातील वाढत्या चोरी च्या घटना पाहता सर्व बिट मध्ये रात्री गस्त वाढवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवावी. ब-याच घटना ह्या भर दुपारी घडल्याने दिवसाही अलर्ट राहणे आवश्यक आहे.

पोलीस चौक्यांची निर्मिती गरजेची

शहरातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता संभाजी नगर, सहारा पार्क, दांडगे लेआउट परिसरात पोलीस चौक्यांची निर्मिती करण्यात यावी. शहरातील सध्याच्या पोलीस चौक्यांच्या व्यवस्थापनातील मरगळ झटकून त्यांना अद्यायावत करावे. या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यमान ठाणेदार भूषण गावंडे हे शहरात शांतता प्रस्थापित करतील. तूर्त…

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129