♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा : मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे

MH 28 News Live, लोणार :  लोणार शहर स्वच्छ शहर व सुंदर शहर बनवण्याकरता महिलांनी पुढाकार घेत हे स्वच्छता अभियान एक चळवळ म्हणून राबविल्यास येणाऱ्या काळात शहर स्वच्छतेबाबत चांगले परिणाम दिसतील; त्यासाठी महिलांनी पुढाकार घेत दिसतेघेतल्यास लोणार शहर स्वच्छ शहर व सुंदर शहर होण्यास काही वेळ लागणार नाही त्याकरता महिलांनी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोणार नगर परिषद च्या नवनियुक्त प्रथम महिला मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे यांनी व्यक्त केले.

नगर परिषदेच्या वतीने दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा ३.० आणि DAY-NULM यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वछोत्सव 2023 व जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त बचत गट महिलांची उपस्थितीत स्वच्छता मशाल मार्च (कचरा वर्गीकरण व स्वच्छता जागृती रॅली) आयोजित करण्यात आली. विनायक चौक लोणार येथून जामा मस्जिद चौक, शहीद अब्दुल हमीद चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे धार परिसर लोणार येथे या रॅली संपन्न झाली. तसेच स्वछोत्सव 2023 अंतर्गत Zero Waste Event ( शून्य कचरा समारंभ प्लास्टिक मुक्त कार्यक्रम ) म्हणून WINS Awards 2023 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बचत गट मधील उत्कृष्ट कामगिरी करणारी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले व सफाई मित्र सुरक्षा चालेंज अंतर्गत महिला सफाई कामगारांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात आले व सर्वांनी स्वच्छता शपथ घेतली. कार्यक्रमाचे समारंभात मुख्याधिकारी नगर परिषद लोणार श्रीमती विभा वऱ्हाडे यांनी परिसर स्वच्छतेबाबत तसेच कचरा घंटागाडीच टाकावा, ओला सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व, शून्य कचरा प्रणाली अंतर्गत ओला कचरा घरच्या घरी जिरवण्यासाठी होम कंपोस्टिंग, सुका कचऱ्याचे पुनर्वापर करण्यासाठी जनजागृती, प्लास्टिकचे वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे बाबत, आदि संदर्भात या वेळी मार्गदर्शन केले.

या वेळी बहु संख्येने बचत गटातील महिला, नगराध्यक्ष सौ. पूनम मनीष पाटोळे, उपाध्यक्ष नूरमोहम्मद खान, पाणी पुरवठा सभापती जोत्सना गुलाबराव सरदार, मनीष पाटोळे, कु. वी. खिल्लारे प्रभारी आरोग्य निरीक्षक अशोक निचंग, प्रभू वाघ, सुशील थोरात, मनोज सरदार, कैलाश नेवरे , स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक अथर अली. DAY-NULM चे घनश्याम भालेराव आदी न.प. अधिकारी, कर्मचारी, न. प. अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळ्यांचे शिक्षक, शिक्षिका व विध्यार्थी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129