म्हणे धरणात ७५% पाणी साठा नळाला मात्र आठव्या दिवशी पिवळे पाणी; चिखली न. प. चा गलथानपणा
MH 28 News Live, चिखली :- चिखलीकरांची तहान भागवणाऱ्या पेनटाकळी प्रकल्पात ७५ टक्के पाणी साठा असताना देखील चिखलीकरांना आठव्या व दहाव्या दिवशी पिवळ्या पाण्याचा पुरवठा होतोय तोही अर्धवटच. त्यामुळे चिखली नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सत्ता कुणाची ही असो, कीतीही मोठ्या प्रमाणात जलसाठा असो मात्र चिखलीकरांना पाणी पुरवठा १० व्या दिवशीच होणार हे उघड सत्य आहे असा ठाम विश्वास आता चिखलीकरांना वाटू लागलाय. मागिल काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न केला मात्र आता पाणी पुरवठा होतोय, पिवळ्या रंगाच्या पाण्याचा, आठव्या दिवशी आणि तोही अर्धवटच. त्यामूळे विविध प्रभागात होत असलेला अर्धवट पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाप्रती चिखलीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणी सोडणारे वॉलमॅन पाणी सोडताना भेदभाव करतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी चिखली नगर पालिकेच्या कुंभकर्णी पाणी पुरवठा विभागाने उन्हाळा लक्षात घेता पाणी पुरवठा करण्याचे बिनचूक नियोजन करून चिखलीकरांना व्यवस्थीत व शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी चिखलीकरांकडून होत आहे.
पिवळ्या व उग्र वासाच्या पाण्यामुळे साथरोग वाढीला
दरम्यान सातत्याने पिवळा व उग्र वासाचा पाणीपुरवठा होत असल्याने सर्दी, खोकला , ताप, जुलाब या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. पहाटे थंडी, दुपारी उन असे वातावरण बदल आणि त्यात अशुद्ध पाणी यामुळे आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button