अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पाहावी लागली ८ महिने वाट, चिखली तालुक्यातील २५ हजार बाधित शेतकऱ्यांपैकी ९८५० शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत नुकसान
MH 28 News Live, चिखली : गत आठ महिन्यापुर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती यामधे शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले सोयाबीन पिक हातचे गेले होते.अतिवृष्टीने तालुक्यातील २५ हजार १६५ शेतकऱ्यांच्या २८ हजार ३०३ हेक्टर वरील पिकाचे यामुळे नुकसान झाले होते.आठ महिने उलटून देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.आता आलेल्या मदती मधे ५ हजार ७९७ शेतकऱ्यां खात्यामधे त्रुटी असल्याने मदत आली नाही. तर १९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या खात्यामधे अडचणी नाही ९५६३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे.१५ हजार ६०२ शेतकरी अद्यापही या अनुदाना पासुन वंचित आहेत.
शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत असुन यामध्ये नुकसानभरपाई देखील उशिरा मिळात असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.शासनाने मदत देण्याची पद्धत बदलून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जाणार असल्याची तरतुद केली आणि ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडायला तब्बल आठ महिन्याचा कालावधी लागला. अखेर मदतीचा दिवस उजाडला आणि एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली. परंतु ही मदत देखील संपूर्ण शेतकऱ्यांना मिळाली नसुन केवळ ९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. खात्यात पैसे आलेल्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे सांगताच ज्यांचे पैसे अद्याप जमा झाले नाही त्यांनी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा करत भंडाऊन सोडले. मात्र शासनानेच अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे केले नाही. तालुक्यात यावर्षी तब्बल ७२ ते ७५ हजार हेक्टर वर सोयाबीनच पेरा झालेला होता. परंतु परतीच्या पावसाने घाण केली आणि काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तत्कालिन तहसीलदार यांनी तात्काळ सर्व साठी बाहेर न पडता चालढकलपणा केला होता.
सर्व्हे झाल्यावर देखील यावेळी मदत उशिरा मिळाल्याने अगोदरच नाराजी होती.आता तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही.या अगोदर नुकसान झाले की पंचनामा आणि त्यानंतर याद्या तयार करण्याचे काम होत होते.त्याबरोबरच पैसे देखील तहसीलदार बँकेत जमा करत होते आणि चेक देत होते बँकेतु तलाठी यांना चेक देऊन तो तलाठी पैसे शेतकऱ्यांच्या यादी नुसार सदर शेतकऱ्यांच्या नावे जमा होत होते.आता मात्र तशी पध्दत रहाली नसुन ऑनलाइन मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
५७९७ शेतकऱ्यांना खाते त्रुटींचा फटका
तालुक्यातील ५७९७ शेतकऱ्यांनी आपल्या बँक पासबुक मधे व्यव्हार न केल्याने ते खाते बंद पडलेले आहे तर काहींचे आधार कार्ड खात्याला लिंक नाही आणि काहींचे आधार कार्ड एका पेक्षा जास्त खात्याला लिंक केलेले आहे त्यामुळे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकली नाही.
९ हजार ८०५ शेतकऱ्यांची मदत दुसऱ्या टप्प्यात
प्रथमच नुकसानीची मदत थेट खात्यात जमा होत असून यामुळे सुरवातीला तांत्रिक अडचणी येणार असल्या तरी नंतर मात्र ही प्रक्रिया सुकर होणार आहे.शेतकऱ्यांनी बँकेचे खाते अपडेट करुन घेतले तर लगेच हे पैसे जमा होणार आहेत.९ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असुन ९ हजार ८०५ शेतकऱ्यांची शासनाने अद्यापही मदत टाकली नाही. शेतकरी मात्र यासाठी तलाठी यांना धारेवर धरत असल्याचे समजते.
शेतकऱ्यांनी खातेनंबरच्या त्रुट्या दुर कराव्या – तहसीलदार सुरेश कव्हळे
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामधे अडचणी आल्या आहेत त्यांची यादी संबंधित गावाच्या तलाठ्यांकडे देण्यात आलेली असुन ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्या शेतकऱ्यांनी आपली त्रुटी चेक करुन ती बँकेत जाऊन दुरुस्त करावी असे आवाहन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button