मेहकरात घडले सोनार एकतेचे दर्शन. सर्व शाखीय सुवर्णकार महासंमेलन उत्साहात संपन्न
MH 28 News Live, मेहकर : सोनार समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक विकासाच्या उद्देशाने सामाजिक एकिकरण करण्यासाठी मेहकर येथे महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार एकत्र जमले होते. विदर्भ मराठवाड्यासह खान्देशातील सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा मेळावा मेहकर येथे दि. २१ एप्रिल रोजी संपन्न झाला.
खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, सोनार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर, महासचिव देवेंद्र शेरेकर, रामदास काटकर अध्यक्ष सोनार विकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय उपाध्यक्ष द्वय विलासराव अनासने, सुभाष वेदपाठक तथा सचिव द्वय सूर्यकांत बेल्हेकरव अविनाश बिंड या मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. शाम उमाळकर सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस हे या प्रसंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणें विविध शाखेचे विद्यमान अध्यक्ष , त्यांचे सदस्य यांची बहुसंख्य उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र शेरेकर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी समाजाने एकत्रित येण्याची गरज का आहे, त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या दरबारी प्रलंबित मागण्या आपल्याला पुर्ण करायच्या आहेत. आदि बाबतीत त्यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सेवाव्रतींचा आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला यामध्ये द्वारकाधिश प्रतिष्ठान नागपूर तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ यांना अनंतराव उंबरकर यांच्या हस्ते गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले. खा. जाधव आणि आ. रायमुलकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सोनार समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन देत शासन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे सांगितले. या संमेलनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा निधि व संत नरहरी महाराज कन्यादान योजना या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दुपारच्या महिला वर्गाच्या सत्रामध्ये भाग्यवान महिलांना पैठणीचे वितरण करण्यात आले. उपस्थित महिलांना प्रसिद्ध समाजसेविका अर्चना देव आणि सौ. माधवी रत्नपारखी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मान्यवर महिलांची उपस्थिती होती. या दरम्यान इंडियन आयडाँल कैवल्य केजकरने ” माऊली माउली ” हे सुमधुर गीत सादर केले. त्यामुळे कार्यक्रमात उत्साह वाढला. उपस्थितांनी सुद्धा त्याला दाद दिली.
अध्यक्ष मोहन हिवरकर यांनी समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील तरुणांना संत नरहरी सोनार आर्थिक महामंडळ मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहकर येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन ठोसर, संतोष सावळकर, जयश्री चाकोते, संध्या सारोळकर, ललिता ठोसर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम तर शेवट राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाजातील संघटना व त्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button