सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले युतीच्या कार्यकर्त्यांनी चिखली जल्लोषात स्वागत
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजपा – शिवसेना युतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आपला निर्णय दि. ११ मे रोजी जाहीर केला. या निर्णयामुळे शिंदे – फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला असून चिखली शहरांमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. फटाके फोडून व घोषणा देत जल्लोषांमध्ये कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे धुमधडाक्यात स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी ११ वाजता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी प्रचंड घोषणाबाजी व फटाक्याचे आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. शिंदे – फडणवीस सरकारच्या अनुकूल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याची भावना दोन्हीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे आपल्या नेत्यांनी केलेली कृती आणि युती अगदी योग्य होती त्यावर शिक्कामोर्तब झाले अशा शब्दात भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेशअप्पा खबुतरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप, विठ्ठल जगदाळे यांच्यासह अँड. मंगेश व्यवहारे, सुदर्शन भालेराव, सत्यनारायण लढ्ढा, सुभाषआप्पा झगडे, सुनील वायाळ, सागर पुरोहित, श्याम वाकदकर, शेख अनिस , अनूप महाजन, विजय नकवाल, चेतन देशमुख, सोनूने मामा, हरिभाऊ परीहार, दिलीप मेहेत्रे आदी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button