
देउळघाट येथे साडे तीन लाखांचा गुटखा जप्त
MH 28 News Live, चिखली : देऊळघाट येथे अवैध गुटखा विक्री करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून 3 लाख 51 हजारांचा गुटखाही जप्त करण्यात आला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, १६ मे रोजी पो. नि. अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त माहितीनुसार शेख शकील शेख सत्तार रा. देउळघाट याने त्याचे गोडावूनमध्ये प्रतिबंधीत गुटखा साठवून ठेवून विक्री करीत आहे.
अशा खात्रीलायक बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शेख शकील शेख सत्तार रा. नवाविया मोहल्ला वार्ड नं. -7. देऊळघाट येथील त्याचे गोडावूनवर पंचासह छापा टाकला असता राजनिवास सुगंधीत पान मसाला, जाफरानी जर्दा, विमल पान मसाला, प्रिमीयम नजर गुटखा, बाजीराव गोल्ड पान मसाला, मस्तानी टोबॅको चे एकुण 2632 पुडे मिळुन आले. आरोपी शेख शकील शेख सत्तार वय 36 वर्ष रा. देउळघाट ता. जि. बुलढाणा यांचे विरुध्द पो.स्टे. बुलडाणा ग्रामीण येथे पोहेकॉ दिपक लेकुरवाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोउपनि संदिप सावले, हेको दिपक लेकुरवाळे, पोना राजु टेकाळे, संजय भुजबळ, पंकजकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, मपोना वनिता शिंगणे यांच्या पथकाने पार पाडली.