♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेतीच्या वादावरून हाणामारीत लाठ्या काठ्या, मिरची पावडरचाही वापर, ट्रॅक्टरही पेटवले. परस्पविरोधी गुन्हे दाखल; सरंबा फाटया जवळ घडली घटना

MH 28 News Live, मेरा बु : शेतीच्या वादावरून एकमेकांमध्ये मिरची पावडर फेकून लाठया काट्यांनी तुफान हाणामारी केली एवढ्यावरच न थांबता ट्रॅक्टरही पेटविले अशा एकमेकांच्या तक्रारी वरून अंढेरा पोलिसांनी १५ जणांविरुद्ध विविध कलमाद्वारे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत . ही घटना सरंबा फाट्या जवळील शेतात २७ मे रोजी दुपारी घडली.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे. राजा ते चिखली रोडवर सरंबा फाट्या जवळ गोपी माधव लॉन्सच्या बाजूला दे. मही येथील शिवाजी किसन भोरजे आणि रमेश हिम्मतराव भोरजे यांची शेती आहे . दोघांची शेती नॅशनल हायवे रोडवर असल्याने एकाने रोडला लागून २० गुंठे शेतीची जबरदस्तीने ताब्यात घेवून नागरणी केली असे का केले म्हणून एकमेकांनी गैरकायद्याची मंडळी जमून मिरची पावडर फेकून हातामधील लाठ्या काठ्या व लोखंडी रोडने तूफान हाणामारी झाली आणि ट्रॅक्टरवर पेट्रोल टाकून पेटवून नुकसान केले. या हाणामारीत शिवाजी किसन भोरजे , सदाशिव किसन भोरजे , संदीप शिवाजी भोरजे , किरण सदाशिव भोरजे , केतन सदाशिव भोरजे , रंजना शिवाजी भोरजे , सौ संध्या सदाशिव भोरजे हे सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यामूळे डॉक्टरांच्या आलेल्या मेडीकल सर्टिफिकेट वरून अंढेरा ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार यांनी फिर्यादी शिवाजी किसन भोरजे यांच्या तक्रारी वरून आरोपी रमेश हिम्मत भोरजे , सुरेश हिंमत भोरजे , नितेश हिम्मत भोरजे , प्रशांत बबन भोरजे , निखिल दिलीप पवार रा. चिंचोली निपाणी ता. भोकरदन जिल्हा जालना , सुरेश दगडोबा मुसदवाले रा झोटिंग ता. सि. राजा , सौ .पारू नितेश भोरजे , रोहित रमेश भोरजे , ब्रह्मा श्यामलाल जाधव , बबन लक्ष्मण जाधव यांच्या विरुध्द कलम ३०७, ३२५ , ३२४ , १४३ , १४७ , १४८ , १४९ , ४२७ भा द.वी क, १३५ महा.पो.अधि नियमप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. तर रमेश हिम्मत भोरजे यांच्या तक्रारी वरून आरोपी शिवाजी किसन भोरजे , सदाशिव किसन भोरजे , केतन सदाशिवभोरजे , संदीप शिवाजी भोरजे , किरण सदाशिव भोरजे , युवराज रावजी मुसदरवाले सर्व राहणार देऊळगाव मही यांच्या विरुध्द कलम ३२६, ३२४ , १४३ , १४७ , २४९ भा द.वी क.१३५ महा.पो.आधि नियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून रात्रीला पोलिसांनी कलम ३०७ प्रकरणातील आरोपी रमेश हिम्मतराव भोरजे , प्रशांत बबन जाधव , बबन लक्ष्मण जाधव , सर्व रा, दे .मही यांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार ठाणेदार गणेश हिवरकर यांनी भेट देऊन आढावा घेतला .

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129