♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता

MH 28 News Live / मोताळा : मोताळा शिवारातील एका शेतातील विहिरीत ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्निल मुकुंदा भारंबे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. स्वप्निल भारंबे हा २७ जुलै रोजी सायंकाळी सुमारास ‘थोड्या वेळाने येतो’ असे सांगून घराबाहेर गेला होता. मात्र, तो परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ताची तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती.

दरम्यान, २९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास शेख कयूम यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला असता तो स्वप्निल भारंबे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129