♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किन्होळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी; पुरस्काराने गावातील दोन महिला सन्मानित

MH 28 News Live, किन्होळा : चिखली तालुक्यातील किनोळा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गावातील दोन महिलांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकार कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गट ग्रामपंचायत ब्रह्मपुरी वाडी स्तरीय समितीमार्फत गावातील दोन महिलांची निवड करून पुरस्कार कर्तुत्वान महिलांना त्यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन दिले गेले
सौ. रुक्मिणीबाई अरुण वानखेडे
सौ . जिजाबाई त्र्यंबक नाटेकर
पुरस्काराचे स्वरूप ५०० सन्मानपत्र देऊन गट ग्रामपंचायत ब्रह्मपुरी वाडीतर्फे गौरवण्यात आले.

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गावातील दोन महिलांना सदर महिला ग्रामपंचायत मधील रहिवासी असणे गरजेचे आहे, महिला ग्रामपंचायत मधील रहिवासी असणे गरजेचे आहे, महिलेने केलेले कार्य हे ग्रामपंचायत मध्ये गेलेले असावे, महिला व बालविकास क्षेत्रात किमान तीन वर्षे महिलेने कार्य केलेले असावे, महिलांच्या समस्या व प्रश्न बाबत जाणीव व महिला संवर्धन संवेदनशीलता असणे गरजेचे आहे, सामाजिक क्षेत्रात सहभाग असणे गरजेचे आहे, पुरस्कार साठी पात्र असलेली महिला अत्याचारांमध्ये समाविष्ट नसली पाहिजे, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सक प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार, यासारख्या कार्यामध्ये उत्सवफुर्तपणे पुढाकार घेतलेली महिला असणे बंधन कारक आहे.
सदर पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत २००० रुपये इतके खर्च अपेक्षित आहे सदर खर्च जिल्हा परिषद मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समितीने राबवण्याचे योजना बाबत ग्रामीण विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधी मधून करावा. अशी माहिती ग्रामपंचायत मार्फत देण्यात आली. या कार्यक्रमासाठी सरपंच प्रभाकर भुतेकर, उपसरपंच पती सतीश वानखेडे, संदीप वानखेडे , अंबादास वानखेडे, तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव जाधव,ग्रामपंचायत सचिव पवार, जि.प.प्रा. मुख्याध्यापक शकील पठाण ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी शुभम साळवे, विष्णू वानखेडे गावातील नागरिक व महिलाची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129