♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बुलढाणा – कव्हळा -जानेफळ बस फेरी सुरु करा — सरपंच रवींद्र डाळीमकर यांची मागणी

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील कव्हळा सावरखेड नजीक, करवंड, गोंदनखेड, खामखेड या गावांना जिल्हा मुख्यालयाला जोडण्यासाठी बुलढाणा ते जानेफळ मार्गे करवंड – कव्हळा बस फेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी कव्हळा येथील सरपंच रवींद्र डाळीमकर यांच्या सह गावाकऱ्यांनी विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणायांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.

मौजे कव्हळा सावरखेड नजीक गट ग्रामपंचायतची नागरिकांची लोकसंख्या ४५०० ते ५००० असून खामखेड – गोंदनखेड येथील २००० लोकसंख्या वस्तीची गावे आहेत. खामखेड, गोंदनखेड, खामखेड येथील शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय करवंड येथे आहे. व सावरखेड नजीक गोंदनखेड, खामखेड या गावातील कास्तकारांना टाकरखेड मुसलमान येथे तलाठी कार्यालय असून करवंड येथे पशुवैद्यकीय दवाखाना, विद्यार्थ्यासाठी आश्रमशाळा आहे. त्यामुळे शेतकर्यांना करवंड, टाकरखेड मु. येथे कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयात नेहमी जावे लागते. तसेच खामखेड, गोंदनखेड या आधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्यापपर्यंत बस सेवा फिरकली सुद्धा नाही. अशा परीस्थित नागरिकांना जिल्हा मुख्यालयी शासकीय कामासाठी, विद्यार्थांना शालेय शिक्षणासाठी व वयोवृद्धना दवाखाण्यासाठी बुलढाणा जाण्यसाठी बुलढाणा ते जानेफळमार्गे करवंड -कव्हळा – खामखेड-गोंदनखेड- सावरखेड नजिक बस फेऱ्या सुरु करण्यात याव्या. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच डाळीमकर यांनी दिला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129