♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ती युवती कोण ? सैलानी जवळचा जंगलात आढळला गळफास लावलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह…

MH 28 News Live, पिंपळगाव सराई : बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई वन विभागाच्या सैलानी जवळील जंगलामध्ये २८ वर्षीय अनोळखी महिलेचे कुजलेल्या स्थितीमध्ये प्रेत आढळले आहे. याप्रकरणी पिंपळगाव सराईचे पोलीस पाटील रामेश्वर गवते यांना वनविभागाच्या जंगला जवळील शेतकऱ्यांनी १९ जून रोजी सदर घटनेची माहिती दिली, त्यावरून पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी रायपूर पोलीस स्टेशनला या घटनेची फिर्याद दिली.

घडलेला प्रकार असा आहे की मृतक महिलेचे प्रेत पिंपळगाव सराई वनविभागाच्या जंगलामध्ये गिलछडीच्या झाडाला गळफास घेऊन कुजलेल्या स्थितीमध्ये आढळून आले आहे. सदर महिलेने पाच-सहा दिवसापूर्वी झाडाला गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले पोलीस हेडकॉन्स्टेबल ओम प्रकाश साळवे पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश पालवे यांनी घटनास्थळावर जाऊन मृत महिलेचा पंचनामा केला असता सदर महिलेने झाडाला पांढऱ्या रंगाच्या ओढणीने झाडाला गळफास घेतला मृत महिलेच्या अंगामध्ये हिरव्या रंगाचे शर्ट व विटकरी रंगाची पॅन्ट पायामध्ये भुरकट रंगाची चप्पल होती. रायपूर पोलीस स्टेशनला अनोळखी मृत महिलेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रायपुर ठाणेदार आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश साळवे व ऋषिकेश पालवे करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129