
डेंग्युचा फैलाव होऊ नये यासाठी जनतेचा सहभाग महत्वूपर्ण – सुभाष देव्हडे; आधार सेना व संघटनेच्या दणक्याने आरोग्य विभाग लागला कामाला
MH 28 News Live, चिखली : मागील काही दिवसांपासून शहरातील गजानन नगर, पुंडलिक नगर भागात डेंग्युचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असतांनाही जिल्हा आरोग्यं यंत्रनेसह न. प. ची आरोग्यं यंत्रनेनेदेखील बघ्याची भुमीका घेतली होती. मात्र नागरिकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नावर नेहमीच आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आधार सेना व संघटनेचे अध्यक्ष सुभाष बबनराव देव्हडे यांनी या गंभीर प्रश्नाबाबत ठिय्या आंदोलन करीत आरोग्यं विभागाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी सुभाषदादा मित्र मंडळ, गजानन महाराज मित्र मंडळ यासह आधार सेना व संघटनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
दि. २२ जून रोजी या गंभीर प्रश्नाबाबत न. प. च्या पाणीपुरवठा विभागामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आक्रमक भूमिका घेत आधार सेना व संघटनेचे अध्यक्ष सुभाष देव्हडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विशेष टाकीवर डास रोधक जाळी देखील बसवण्यात आली नाही. तसेच या भागातील नाल्या तुडुंब भरलेल्या होत्या. पाण्याच्या वॉल जवळ साचणारे पाणी वाहते करणे,परिसर स्वच्छता करणे, टाकी साफ करणे , फोगिंग मशीन द्वारे धूर फवारणी करणे, असे उपाय योजना करण्यात आल्या. त्याचबरोबर नगर परिषद तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली व चिखली, बुलढाणा, मेहकर, तालुक्यातील एकूण ३० आरोग्य कर्मचारी एकूण २० आशा सेविका ६ आरोग्य सहाय्यक व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सर्व्हेक्षण मोहीमेअंतर्गत एकूण १८ टीमने १०४३ घरांची तपासणी केली या मध्ये २४३२ पाणी साठे तपासणी करण्यात आले व दूषित पाणी साठया मध्ये टेमीफॉस औषध टाकण्यात आले
डेंग्युचा फैलाव होऊ नये यासाठी जनतेचा सहभाग महत्वूपर्ण – सुभाष देव्हडे
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे या आजारावर विशिष्ट औषधी उपचार नसल्यामुळे आजरापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे व यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून नागरिकांनी आपल्या घरामध्ये डास अळी आढळून येणारे पाणी साठे नियमित तपासणे आवश्यक आहे जर पाणी साठे दूषित आढळल्यास ते पाणी साठे त्वरित रिकामी करून घासून पुसून एक दिवस कोरडा पाळावा असे आवाहन आधार सेना व संघटनेचे अध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी यांनी केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button