♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तलाठी बेपत्ता हवालदिल जनता… लोणार भागमधील तलाठी सौंदर झाले ‘ अदृश्य ‘

MH 28 News Live, लोणार : सध्या सगळीकडे पेरणी पाण्याची आणि शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश गडबड घाई असल्यामुळे शेतकरी असो विद्यार्थी असो तरुण असो सर्वांच्या मागे एकच धावपळ असते ती म्हणजे तलाठ्याकडून दाखला आणणे किंवा प्रमाणपत्र मिळवणे. याशिवाय शेती आणि ग्रामीण भागातील इतर महत्त्वाच्या कागदपत्रासाठी देखील ग्रामस्थांना तलाठ्याकडे वारंवार जावेच लागते. मात्र, लोणार भाग २ मधील तलाठी सौंदर हे मागील काही दिवसांपासून अक्षरशः बेपत्ता असून त्यांच्या अदृश्य राहण्यामुळे जनता मात्र हवालदिल झाली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणार तालुक्यातील भाग २ मधील तलाठी सौंदर हे काम पाहतात. परंतु, हे महाशय आपल्या कामाबद्दल अतिशय बेजबाबदारपणे वागत असतात. त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचे यांना मुळीच भान नसून ते आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी वेळेवर कार्यालयामध्ये सतत गैरहजर असतात; त्यामुळे बऱ्याच वेळेला आलेल्या लोकांची कामे होत नाहीत, त्यांना खोळंबून राहावे लागते आणि वारंवार चकरा मारून हे लोक त्रस्त होतात. अनेक लोकांना कागदपत्रे वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांची महत्त्वाची कामे राखडले असून काही विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबले तर शेतकऱ्यांची कामे देखील अडून पडली आहेत. या शिवाय जाधव हे अतिशय मुजोरपणे वर्तन करतात आणि नागरिकांशी देखील उद्धटपणे संभाषण करून त्यांना अपमानित करतात अशी देखील अनेक नागरिकांकडून होत आहे.

पिक नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

लोणार येथील दिनकर एकनाच दांडगे यांची लोणार शिवारात ग.न. ३४३ मध्य एक एकर शेत जमीन आहे. त्यांना शासकीय पिक भूक्तान भरपाईची रकम मिळालेली नाही. याबाबर त्यांनी तहसील कार्यालयात चौकधी केली असता तुमचे नांव यादीमध्ये अले नाही असे सांगण्यात आले. या संदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी दांडगे हे तलाठी सौंदर यांना भेटण्यासाठी वारंवार त्यांच्या कार्यालयात गेले असता सदर कार्यालय सतत बंद असून तलाठी सौंदर हे देखील भेटत नसल्याने दिनकर दांडगे हे पिक नुकसानीपासून अद्यापही वंचित आहेत. असे अनेक शेतकरी लोणारमध्ये असून ते देखील तलाठी सौंदर यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129