
नागपूर – मुंबई महामार्गावर खामखेड बसस्टँड जवळ भीषण अपघात 3 जागीच ठार तर 2 गंभीर
MH 28 News Live, मेहकर : lनागपूर – मुंबई हायवेवर खामखेड बसस्टँड जवळ दिनांक 23 एप्रिल ला सकाळी 3.00 च्या सुमारास चिंतामणी (सनी ट्रॅव्हल्स ) गाडी क्रमांक MH 40 BL 7061 व अल्टोकार गाडी क्रमांक MH 06 W 5134 यांची समोरासमोर धडक होऊन अल्टो कार मधील 5 व्यक्ती पैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला.तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे.
अल्टोकार ही चाळीसगाव येथील असून ते डिग्रस येथे साखरपुडा समारंभासाठी जात असतांना हा अपघात घडला. यामधील इंदल चव्हाण वय 38 वर्षे, योगेश विसपुते वय 24 वर्षे , विशाल विसपुते वय 34 वर्षे अशी मुत्यु झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत. तर कारचे गाडी चालक ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण वय 32 मिथुन रमेश चव्हाण वय 17 वर्षे हे जखमी असुन यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेची
माहीती मीळताच घटनास्थळी मेहकर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निर्मला परदेशी सह कर्मचारी हजर झाले जखमींना उपचारासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. यावेळी आरोग्य विभाग ही सज्ज होता जखमी व्यक्ती याने 112 क्रमांकावर फोन लावल्याने सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे कळाले.पो. काॅ.अनिल देशमुख,पो.काॅ.मोहन जाधव, पो. काॅ.देवेंद्र इंगळे, पो काॅ प्रविण साबळे, पो.का.खलीद खान,पो काॅ.जाधव यांनी परिश्रम घेतले तर पुढील तपास पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी स्वतः करीत आहेत.



