♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात विक्रम; एकाच शाळेच्या ११ विद्यार्थिनी राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत ठरल्या अव्वल !

 

MH 28 News Live, बुलढाणा : एकाच शाळेतील तब्बल ११ विद्यार्थिनींनी विभागीय स्पर्धेत अव्वल कामगिरी केल्याने त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मैदानी (ॲथलेटिक्स) खेळातील ही विक्रमी कामगिरी ठरली आहे.

पाडळी (ता. बुलढाणा) येथील रामरक्षा इंग्लिश स्कूलच्या मुलींनी हा विक्रम केला आहे. अमरावती विभागीय शालेय मैदानी (ॲथलेटिक्स) क्रीडा स्पर्धा अकोला येथे १६ ते १९ ऑक्टोंबर दरम्यान पार पडल्या. स्पर्धेत अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यासह अमरावती महानगर पालिका व अकोला महानगर पालिका असे सात शालेय संघ सहभागी झाले होते.

रामरक्षाच्या विध्यार्थिनींनी ही स्पर्धा अक्षरशः गाजविली. हुमान्सी मुत्रे, पायल गायकवाड, सिद्धी डिडोळकर, पूनम बनगाळे, पूजा लोखंडे, गायत्री तायडे, जिज्ञासा जाधव, दिव्या जाधव, दीक्षा जाधव, स्वाती राठोड, छाया गाढवे यांनी विविध धाव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे २९ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी त्या पात्र ठरल्या आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129